इचलकरंजीतील ‘त्या’ बेपत्ता महिलेचा मृतदेह नदीपात्रात सापडला…

0
146

इचलकरंजी (प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इचलकरंजीतील गांधी कॅम्प परिसरातील राहणाऱ्या सौ. अलका सुभाष रेडेकर यांचा आज (बुधवार) दुपारच्या सुमारास मृतदेह नदीपात्रात जँकवेल शेजारी  आढळून आला.  या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत नोंद झाली आहे.

सौ. अलका रेडेकर या ३० जानेवारी रोजी घरातून कोणालाही न सांगता बेपत्ता झाल्या होत्या. या प्रकरणी नातेवाईकांनी गावभाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. आज त्यांचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. या बाबतची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता हा मृतदेह अलका रेडेकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सीमा डोंगरे करीत आहेत.