यड्रावमध्ये गटारीमध्ये सापडला युवकाचा मृतदेह…

0
362

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्रावमध्ये रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गटारीमध्ये आज (बुधवार) दुपारच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून आला. संदीप वासुदेव  मांगलेकर (वय ३०, रा. यड्राव, शिरगावे चाळ) हा या चाळीत एकटाच राहत होता.

मांगलेकर हा यड्रावमधील माजी ग्रा.पं. सदस्य सदाशिव कोरवी यांच्याकडे कामगार म्हणून कार्यरत होता. आज दुपारी लहान मुलांना चिंचा काढताना गटारीमध्ये मांगलेकर पडलेला दिसला. याची माहिती गावचे पोलीस पाटील जगदीश संकपाळ यांनी पोलीस स्टेशनला कळवली. तो दारूच्या नशेत गटारीमध्ये पडल्याने मयत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मांगलेकर याचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस हवालदार चलचुक, रवी महाजन अधिक तपास करीत आहेत.