कळे (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील  मोताईवाडी येथील मोताईदेवी   मंदिरातून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आज (रविवार) दुपारी चारच्या सुमाराला बोरगाव येथील कासारी नदीत मृतदेह सापडला. संपदा नारायण बने (वय ४०) असे या मृत महिलेचा नाव आहे. 

संपदा या १३ ऑक्टोबर रोजी ऊसाच्या शेतात गेल्या होत्या. मात्र, त्या घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबाने त्यांचा शोध घेतला. मात्र, त्या आढळून आल्या नाहीत. पण, त्यांचा आज (रविवार) बोरगावच्या हद्दीत असणाऱ्या महारमळा शेताशेजारी नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. संपदा यांच्या अंगावर असलेले  दागिने आहेत त्या स्थितीत आढळून आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.