खोकुर्ले येथील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह जंगलात सापडला

0
201

साळवण (प्रतिनिधी)  : गगनबावडा तालुक्यातील खोकुर्ले गावातील मनोहर रामा पाटील यांचा मृतदेह प्रभूची मळी नावाच्या जंगलात आढळून आला आहे.  ते मागील २० ते २५ दिवसापासून बेपत्ता होते. याबाबत बेपत्ता झाल्याची फिर्याद गगनबावडा पोलीस ठाण्यात  देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत होता. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती कमी झाली होती. पुढील तपास गगनबावडा पोलीस करत आहेत.