गडहिंग्लजच्या पूरग्रस्त भागात भाजप-राजे फौंडेशनतर्फे औषध फवारणी…

0
55

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील नदीवेस पुरग्रस्त भागात रोगराई पसरण्याचा धोका लक्षात घेऊन आज (शुक्रवार) सकाळी गडहिंग्लज भाजपच्या वतीने आणि राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशनच्या सहकार्याने औषध फवारणीस प्रारंभ करण्यात आला. आठवडाभर दररोज सकाळी सर्व प्रभागात ही औषधं फवारणी सुरू रहाणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) समरजितसिंह घाटगे यांनी नुकताच गडहिंग्लजमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता, त्या वेळी त्यांनी ही सूचना केली होती.

या वेळी भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, कार्यकारी अध्यक्ष प्रितम कापसे, राजे बॅंकेचे संचालक रविंद्र घोरपडे, चंद्रकांत सावंत, सुभाष चोथे, सुनिल गुरव, अनिल खोत, भिमा कोमारे, आनंद पेडणेकर, संदिप नाथबुवा, अमित भिऊंगडे, वरुण गोसावी, अजित जामदार, विठ्ठल भमानगोळ, अजित विटेकरी आदी उपस्थित होते.