सम्यक मागासवर्गीय वाचनालयाचा वर्धापन दिन उत्साहात

0
93

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सम्यक मागासवर्गीय सार्वजनिक वाचनालयाचा  प्रथम  वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून वाचकांसाठी ४४६ नवीन पुस्तके वाचकांना वितरणासाठी खुली करण्यात आली.

प्रमुख अतिथी म्हणून अॅड. रविकिरण बिरजे, उपाध्यक्ष सागर माने,  खजानिस- संजय कामत, सेक्रेटरी वैभव शिंदे, सदस्य तानाजी शिंदे,  किरण नाईक, अनिल नाईक,  ग्रामपंचायत सदस्य सयाजी घोरपडे, विनोद माने,  मधूकर शिंदे,  प्रकाश गायकवाड, संजय मिसाळ, शुभम जिरगे, आकाश नाईक आदी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष राहुल शिंदे  यांनी केले.

वाचनालयामध्ये कथा, कथासंग्रह, कादंबरी, कवीता, ललितसाहित्य, नाटक, महिला विषयी कायदे, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान, पर्यावरण, वास्तुशास्त्र, ज्योतीष्य, धार्मिक, व्यावसायिक, व्यापार विषयक आरोग्य विषयक, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा विषयक, संदर्भ ग्रंथ, बाल व किशोर वाड्मय,  अनुवादित पुस्तके आदी विषयांच्या पुस्तकांचा समावेश आहे.