नारायण राणेंच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

0
22

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरासमोर वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी आंदोलन केले. याबद्दल  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानावर आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केले. 

मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत आंदोलनं केली. यावेळी युवासेना आणि राणे समर्थकांमध्ये प्रचंड राडा झाला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी राणेंच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांची पाठ थोपटली. दरम्यान, या  भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.