महापालिकेच्या प्रशासकपदाची सूत्रे घेताच आयुक्तांचा कारवाईचा धडाका

0
79

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर महापालिकेमध्ये प्रशासक राजवट सुरू होताच प्रशासक आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. महापालिकेतील वेळेत न आलेल्या २२ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस,  तर विनामास्क आढळलेल्या ३२ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणि विना आयकार्ड आढळलेल्या ७ कर्मचाऱ्यांना ताकीद दिली आहे. दरम्यान महापालिकेमध्ये शिस्त मोडणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

महापालिकेतील लेट आलेल्या २२ कर्मचाऱ्यांमध्ये मुख्यलेखापाल ७,  मुख्य लेखापरीक्षक २, रेकॉर्ड विभाग ३, पवडी अकांऊट विभाग ७ आणि भांडार विभागाच्या ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच विनामास्क आढळलेल्या  विविध विभागाकडील ३२ कर्मचाऱ्यांकडून ३ हजार २०० रुपयांचा दंड जागेवरच वसूल केला. त्याचप्रमाणे कार्यालयीन कामाच्यावेळी  विना आयकार्ड आढळलेल्या विविध विभागाकडील ७ कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यात आली आहे.