हमिदवाडा (प्रतिनिधी) : इथेनॉल निर्मिती साखर कारखान्यासाठी वरदान ठरणार आहे. देशात ५५० कोटी लिटर दरवर्षी इथेनॉल निर्मिती केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या कारखान्याने इथेनॉल प्रकल्पाची क्षमता दुप्पट करण्याबरोबर ऊस उत्पादन गाळप क्षमता व सहवीज प्रकल्प विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. सभासदांनी स्वभाडवलांसाठी कारखान्याकडे ठेवीच्या रूपाने स्वनिधी द्यावा, असे आवाहन चेअरमन संजय मंडलिक यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केले.

यावेळी मंडलिक यांनी, कारखान्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असून कारखान्याचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. त्याचबरोबर उच्चांकी गाळपासाठी सर्वाधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्याकडे ऊस पुरवठा करावा असे मत संजय मंडलिक यांनी व्यक्त केले.