कोल्हापूर (प्रतिनिधी) : मी कडवट हिंदुत्ववादी असल्यानेच पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मला गोकुळमध्ये स्वीकृत संचालक म्हणून घेण्यास विरोध करीत आहेत. असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.     

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची  अंमलबजावणी करण्यास गोकुळचे नेतृत्व करणारे दोन्ही मंत्री विरोध करीत आहेत. यामागे राजकीय स्वार्थ आणि कडवट हिंदुत्वाला विरोध हेच कारण आहे. गोकुळ दूध संघाच्या शासन नियुक्त स्वीकृत संचालक पदी माझी निवड झाली आहे. पण त्याची अंमलबजावणी दीड महिना झाली तरी का करीत नाहीत ?. शिवसेनेबाबत दुजाभाव करीत नाही असे म्हणणारे पालकमंत्री मुख्यमंत्र्याच्या आदेशाची अंमलबजावणीबरोबरच शिवसैनिकांच्या कामासंदर्भात  किती फोन घेतात आणि किती दाद  देतात  याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे.

ना. मुश्रीफ यांनी गोकुळच्या निवडणुकीत कागलच्या उमेदवाराला पाडले आणि पुन्हा त्यांची सहानुभूती मिळवली हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार केला आहे. आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या आदेश डावलून केलेला अवमान तमाम शिवसैनिक कदापी सहन करणार नसल्याचे या पत्रकात म्हटले आहे.