शरजील इस्मानीला पळून जाण्यास ठाकरे सरकारची मदत

0
88

मुंबई (प्रतिनिधी) : हिंदूविरोधी वक्तव्य करणारा शरजील इस्मानी महाराष्ट्रबाहेर पळून गेला. त्याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पळून जाण्यास मदत केली, असा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. ते मुंबईत  पत्रकार परिषदेत बोलत होते.

शेलार म्हणाले की, शरजीलने केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणे याचा अर्थ यांचे डोकं ठिकाणावर आहे का ? असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. आम्ही मागणी केल्यावर त्याला अटक करणार का,  परिषदेला परवानगीच का दिली ?, असा प्रश्न करून शरजीलने परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर त्याला मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर का जाऊ दिले ? त्याला पळून जाण्यासाठी मदत करण्याचे पाप सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीने केले आहे.  शिवसेनेने हिंदूंना सडलेला म्हणणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचे काम का केले ?, हे स्पष्ट करावे, अशी मागणी शेलार यांनी केली.