चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल्स या कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. बाळासाहेब रामचंद्र गाढवे (रा. खेर्डी, ता. चिपळूण), महेश महादेव कासार (रा. बीड), राजेश मराठकर (रा. औरंगाबाद), आशिष गोगावले (रा. चिपळूण) अशी त्यांची नावे आहेत. हा प्रकार आज (शनिवार) सकाळी घडला. या स्फोटात अन्य ३ कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अभिजित सुरेश तावडे या गंभीर जखमी रुग्णावर मुंबईत उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल सकाळी 9 वाजेच्या सुमारास घरडा कंपनीत अचानक स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, या स्फोटात चार कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. आहे. ४ जण जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोटे एमआयडीसीमधील या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. सोमवारी सुप्रिया लाइफ सायन्स प्रा. लि. या कंपनीला लागलेल्या आगीत तिघे जखमी झाले होते.  शेकडो कामगार असताना कंपनीत आग लागली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. ही घटना ताजी असताना आज घरडा कंपनीत स्फोट झाला आहे.