शिवसेना तालुका उपप्रमुखावर डिझेल फेकल्याने कुरूंदवाडमध्ये तणाव

0
543

शिरोळ (प्रतिनिधी) : फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याच्या रागातून नूर काले यांच्या समर्थकांनी शिवसेना तालुका उपप्रमुख युवराज घोरपडे यांच्या दत्तवाड येथील हॉटेलवर दगडफेक केली. तसेच कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर डिझेल टाकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरून संतप्त शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी शिवसैनिक व पोलिसांमध्ये झटापट झाली. यामुळे शनिवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी शिवसैनिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण शिवसैनिकांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. यावर गायकवाड यांनी दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल व कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे आश्वासन दिले. त्यानंतर शिवसैनिक शांत झाले. 

यावेळी उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, तालुका प्रमुख वैभव उगळे, जिल्हा महिला संघटिका मंगलताई चव्हाण, वैशाली जुगळे, शहर प्रमुख बाबासो सावगावे, आपासो भोसले, पिंटू नरके आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.