सावरवाडी (प्रतिनिधी) : शेतीची उत्पादन क्षमता वाढविण्याबरोबर शेतीला हंगामानुसार पाणी मिळावे. यासाठी राज्य शासनाने शेतीसाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा करावा. अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य कौन्सील सदस्य नामदेव पाटील यांनी केली.

पाटील म्हणाले की, सध्या ग्रामीण भागात नदी आणि विहीरीतून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. रात्रीच्या वेळी शेतीला पाणी पाजण्यासाठी अनेक अडचणी शेतकऱ्यांना येतात. त्यासाठी शेतीला दिवसा पाणी पुरवठा करण्यासाठी दहा तासांचा वीज पुरवठा करणे गरजेचे आहे. यासाठी  महाविकास आघाडी शासनाने शेतीसाठी नवीन धोरण राबवावे असेही पाटील म्हणाले.