येळवडे येथे टेम्पो-दुचाकीची धडक : एकजण जागीच ठार

0
1950

राशिवडे (प्रतिनिधी)  : राशिवडे – येळवडे रस्त्यावर ओव्हरटेक करताना मालवाहतूक टेम्पोवर दुचाकी जोरात धडकली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात आज (गुरूवार) सकाळी ११ वाजता झाला. शिवाजी दत्तात्रय कुलकर्णी (वय ५२, रा.पुंगाव) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी कुलकर्णी आपल्या हिरोहोंडा मोटरसायकल (एम ०९ डीबी ०७६७) वरून कामानिमित्त राशिवडेकडे जात असताना येळवडे येथील दत्त मंदिरानजीक मुख्य रस्त्यावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात येळवडेकडे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पो (एमएच ०९ ईएम ६२६४)  वर जाऊन आदळले. यामध्ये त्यांच्या डोक्यास मार लागून खूप मोठा रक्तस्राव झाला. यात जागीच त्यांचा मृत्यू झाला .

या अपघाताची राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.  मृतदेह सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.