देव-देवतांची मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थाने : ना. हसन मुश्रीफ

0
34

कडगाव (प्रतिनिधी) : विविध समाजांच्या देव-देवतांची मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थाने आहेत, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ते गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव येथे संत शिरोमणी श्री. नामदेव महाराज मंदिराच्या लोकार्पण समारंभात बोलत होते. ना. मुश्रीफ यांच्या निधीतून या मंदिराची उभारणी झाली आहे.

ना. मुश्रीफ म्हणाले की, सव्वा टीएमसी साठवण क्षमतेचा आंबेओहोळ प्रकल्प तुडुंब भरलेला आहे. या प्रकल्पाच्या पाण्यावर वैयक्तिक, शेतकरी मंडळाच्या आणि सामुदायिक अशा प्रकारच्या पाणी योजना तयार करून हरितक्रांती करूया. या योजनांसाठी लागणारे आर्थिक सहकार्य सर्वतोपरी करू. शेतकरी मंडळाच्या पाणीयोजना उभारण्यासाठी केडीसीसी बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करू. सामुदायिक मोठ्या पाणी योजना उभारण्यासाठी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या हमीवर अर्थपुरवठा करणार असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी जि.प. सदस्य सतीश पाटील-गिजवणेकर, सरपंच संजय बटकडली, नेताजी पाटील, बंटी पाटील, सदानंद पाटील आनंदा पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.