कुणाच्या किती बायका सांगू का ?; कशाला खोलात जायला सांगता : अजित पवार

0
291

पुणे (प्रतिनिधी) : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या महिलेने आपली तक्रार मागे घेतली आहे. यावर भाजपवाले दबावामुळे तक्रार मागे घेतल्याची टीका करत आहेत. या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.  

पवार म्हणाले की, आता जर इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या, तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगता. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्माबाबत जाहीरपणे सांगितले आहे. विरोधकांनी उगीच फाटे फोडू नये. कुणी काय काय लपवाछपवी केली, कुणाचे लग्न झाले होते, कुणाला किती मुलं होती. लग्न झालं होतं की नाही झालं, कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही का?, असा इशारा पवार यांनी विरोधकांना दिला.