‘तांडव’ या सैफ अली खानच्या वेब सीरिजचा टीझर प्रदर्शित

0
75

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची आगामी सीरिज ‘तांडव’ लवकच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘तांडव’ वेब सीरिज ही राजकारणावर आधारित असून अली अब्बास जफरने निर्मिती केली आहे. नुकताच या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

‘तांडव’ या वेब सीरिजचा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या एक मिनिटाच्या टीझरमध्ये सैफ अली खान हा एका राजकीय नेत्याची भूमिका साकारणार असल्याचे दिसत आहे. सैफचा हा हटके अंदाज पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. या सीरिजच्या माध्यामातून अली अब्बास जफर यांच्या सोबतच डिंपल कपाडिया डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहेत. तसेच या सीरिजमध्ये अभिनेता सैफ अली खान, झीशान अय्यूब आणि सुनील ग्रोव्हर एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. ‘तांडव’ ही वेब सीरिज १५ जानेवारी २०२१मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.