टीम इंडियाच्या खेळाडूंची दसऱ्यापूर्वीच ‘दिवाळी..!’

बीसीसीआयकडून परदेश दौऱ्यावरील भत्त्यांमध्ये दुप्पटीने वाढ

0 108

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीने भारतीय खेळाडूंच्या परदेश दौऱ्यावरील भत्त्यांमध्ये दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे खेळाडूंची दसऱ्या पूर्वीच दिवाळी साजरी होणार आहे. भारतीय संघाची परदेशी दौऱ्यातील सर्वोत्तम कामगिरीवरून ही वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परदेश दौऱ्यावर असताना भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला आता दरदिवशी २५० अमेरिकन डॉलर मिळणार आहेत. (रुपयांमध्ये अंदाजे १७ हजार ७९९) याआधी भारतीय खेळाडूंना दरदिवसाला १२५ अमेरिकन डॉलर भत्त्याच्या स्वरुपात मिळायचे. (रुपयांमध्ये अंदाजे ८ हजार ८९९) भारतीय संघाच्या परदेश दौऱ्यात विमानाने बिझनेस क्लासचा प्रवास, हॉटेलमधलं राहणं आणि लाँड्री याचा खर्च बीसीसीआय करतं. या व्यतिरीक्त खेळाडूंना २५० अमेरिकन डॉलर भत्त्याच्या स्वरुपात मिळणार आहेत.

विश्वचषकात पराभवाचा फटका बसल्यानंतर भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यात दमदार पुनरागमन केलं. टी-२०, वन-डे आणि कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवत भारताने मालिका खिशात घातली. यानंतर भारत थेट २०२० साली जानेवारी महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी भारताचा सर्व सामने आपल्या घरच्या मैदानावर खेळायचे आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More