शिक्षक बँक संचालक अर्जुन पाटील यांचे हातकणंगलेत स्वागत

0
29

टोप (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी संस्थांची शिखर संस्था असलेल्या दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालकपदी तासगाव, ता. हातकणंगले येथील अर्जुन दिनकर पाटील यांची प्रचंड मताधिक्याने निवड झाली आहे. शिक्षक बँकेच्या हातकणंगले शाखेत शानदार स्वागत करून अर्जुन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

अर्जुन पाटील यांनी आपल्या समर्थक शिक्षक सभासदांच्या व निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक आघाडीमध्ये सहभागी शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बँकेच्या हातकणंगले शाखेत समारंभपूर्वक प्रवेश केला. शिक्षक बँकेच्या हातकणंगले शाखेत झालेल्या स्वागत कार्यक्रमास मारुती पाटील, धनाजी शेवाळे, प्रकाश पाटील, सिद्राम भानसे, राजेश जाधव, कृष्णात पाटील, संजय कुंभार, सागर पाटील, बालाजी पांढरे, दयानंद पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.