हातकणंगले तालुक्यातील तासगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध

0
414

हातकणंगले (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सुमारे सव्वाचारशेहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. हातकणंगले तालुक्यातील तासगाव ग्रामपंचायतीची निवडणूक  बिनविरोध झाली आहे. यासाठी  माजी आमदार अमल महाडिक व आ. विनय कोरे यांचे सहकार्य लाभले. ९ पैकी ७ जागा महाडिक गटाचे शिवाजीराव पाटील (काका) यांच्या गटाला तर कोरे गटाचे संपतराव पाटील यांच्या गटाला २ अशी विभागणी करून ही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली आहे.