तांबाळे-अथनी शुगर लिमिटेडचे साडेचार लाख टन गाळपाचे उद्धिष्ट : नामदेव भोसले

0
76

कडगांव (प्रतिनिधी) : अथनी शुगर्स भुदरगड युनीट तांबाळे साखर कारखान्याचा २०२१-२२ या ६ व्या गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन आज (शुक्रवार) करण्यात आले. कारखाना व्यवस्थापनाने ठरवलेले साडेचार लाख मेट्रीक टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करण्याचा विश्वास कारखान्याचे चिफ इंजिनियर नामदेव भोसले यांनी व्यक्त केला. तसेच या उद्धिष्टानुसार आम्ही कारखान्यातील सर्व कामे वेळेत पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी एल.बी.देसाई यांनी, साडेचार लाख टन क्रशिंग करण्यासाठी लागणारी तोडणी वाहतूक यंत्रणा आम्ही सक्षम केली आहे. तोडणी कामगारांना पहिला हप्ताही पोहोचला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस आमच्या साखर कारखान्यास पाठवून देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी कारखान्याचे पी.व्ही.खटावकर, कार्यालय अधिक्षक बाबासाहेब देसाई,  कन्हैया गोरे, जमीर मकानदार, शशिकांत थोरवत, शिवाजी खरुडे,सतिश पाटील, सुनिल घुगरे, जगदिश घोरपडे, दिलीप गायकवाड आदी उपस्थित होते.