अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा : काँग्रेस मंत्र्याच्या कार्यकर्त्यांना सूचना

0
24

मुंबई (प्रतिनिधी) : दलित आणि मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आऱक्षणासंदर्भात कोणताही निर्णय राज्य सरकारडून होत नाही. मंत्रालयामधील काही झारीमधील शुक्राचार्य कुणाच्या तरी दाबावाखाली येऊन या निर्णयासंदर्भात अडवणूक करत आहेत, असा आरोप करून पदोन्नतीसाठी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढण्याचे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेसच्या अनुसूचित जाती, जमातीच्या सेलमधील कार्यकर्त्यांना केले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या एका मंत्र्याने थेट उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचे आवाहन समर्थकांना केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बिघाडी होण्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा, मी सुद्धा त्यामध्ये सहभागी होईल, असे म्हटले आहे. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये कुरबुरी सुरू असल्याचे बोलले जात आहे.