बावड्यातील गोळीबार मैदानात उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करा : मनसे

0
163

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कसबा बावड्यातील गोळीबार मैदानात बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, कसबा बावड्यातील गोळीबार मैदान येथे बेकायदेशीर उत्खनन करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाला आहे. याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आवाज उठवत असून तातडीने बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

यावेळी शहर अध्यक्ष गणेश लाड, अजित पाटील, उपशहराध्यक्ष उत्तम वंदूरे, जिल्हाध्यक्ष राहुल नाईक, ‘ए’ वॉर्ड प्रभाग संघटक अनिकेत बिराडे, सृष्टी मोरे, राहुल ढवळे, प्रशासकीय सल्लागार आनंद चव्हाण आदी उपस्थित होते.