महिलेच्या मृत्यूस जबाबदार डॉक्टरवर कारवाई करा : दलित महासंघाचे उपोषण

0
134

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शस्त्रक्रियेनंतरही त्रास कमी न होता महिलेचा मृत्यू झाला. यास डॉक्टराचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून संबंधित डॉक्टरावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बहुजन दलित महासंघाच्या वतीने आज (सोमवार) इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.   

चिकोडी येथील यासिन जावेद कुरुंदवाडे ही महिला २४ सप्टेंबर २०२० रोजी शहरातील एका खासगी रूग्णालयात पोटात दुखत असल्याने दाखल झाली होती. यावेळी तिची वैद्यकीय तपासणी करून शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु काही दिवसांनी या महिलेला पुन्हा त्रास होऊ लागला. आणि यातच तिचा मृत्यू झाला. याबाबत महिलेच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु याकडे दुर्लक्ष करून तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे याकडे लक्ष वेधण्यासाठी बहुजन दलित महासंघाच्या वतीने मृत महिलेल्या लहान मुलींसह  आज येथे उपोषण करण्यात आले.

यावेळी बहुजन दलित महासंघाच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सुरेखा काटकर, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सागर लाखे, इचलकरंजीचे शहराध्यक्ष बादल हेगडे, उपाध्यक्ष नारायण आगवणे, आकाश भडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.