टी-२० वर्ल्डकप स्पर्धा : भारताची पहिली लढत पाकिस्तानशी   

0
99

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात होणारी  आयसीसी टी-२० वर्ल्डकप  स्पर्धा कोरोनामुळे ओमान आणि यूएईमध्ये पार पडणार आहे.  या स्पर्धेच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. पहिला सामना १७ ऑक्टोबरला तर अंतिम सामना १४ नोव्हेंबररोजी होणार आहे. तर भारताची पहिली लढत २४ ऑक्टोबररोजी पाकिस्तानशी होणार आहे.

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे गट जाहीर झाले असून मुख्य स्पर्धेत १२ संघ  खेळणार आहेत. आयर्लंड,  नेदरलँड्स,  श्रीलंका आणि नामिबियाला ‘अ’ गटात,  तर ओमान, पीएनजी, स्कॉटलंड आणि बांगलादेशला ‘ब’ गटात स्थान दिले आहे. प्रत्येक गटातील फक्त अव्वल दोन संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करतील.

भारताचे सामने खालीलप्रमाणे : –

भारत विरुद्ध पाकिस्तान – २४ ऑक्टोबर,  संध्याकाळी ६ वाजता, दुबई

भारत विरुद्ध न्यूझीलंड – ३१ ऑक्टोबर ,संध्याकाळी ६ वाजता, दुबई

भारत विरुद्ध अफगाणिस्तान – ३ नोव्हेंबर, संध्याकाळी ६ वाजता, अबुधाबी

भारत विरुद्ध बी १,   –  ५ नोव्हेंबर – संध्याकाळी ६ वाजता,  दुबई

भारत विरुद्ध ए २,    –  ८  नोव्हेंबर – संध्याकाळी ६ वाजता,  दुबई