इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील शिक्षण क्षेत्रातील सेवाव्रती व्यक्तिमत्त्व तात्यासाहेब तथा टी. डी. कुडचे यांचे गुरुवारी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.

शिक्षक या नात्याने त्यांनी प्रारंभी खडतर प्रवास केला. स्व. बापूजी साळुंखे यांच्या सहवासात राहून त्यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान देत संस्थेच्या अनेक ठिकाणी लोकवर्गणीतून वास्तू आकाराला आणल्या. निवृत्तीनंतर उसंत न घेता डीकेटीई, बाहुबली आदी शिक्षण संस्थांच्या ज्ञान मंदिराला उभारणी दिली. राज्य शासनाने ‘राज्य आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांनी पत्नी वेणूताई यांना विवाहानंतर शिक्षिका बनवले. त्यांनाही आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. त्यांच्यामागे डॉक्टर अभय, अनंत, लक्ष्मी औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष अनिल तथा राजू, अविनाश अशी चार मुले आहेत. गुरुवारी पंचगंगा नदी घाटावर त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.