कोल्हापुरात शिवसैनिकांकडून येडियुरप्पांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन (व्हिडिओ)

0
457

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. या प्रकारच्या निषेधार्थ आज (मंगळवार) कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

 

शिवसैनिकांनी यावेळी येडीयुरप्पा मुर्दाबादच्या घोषणा देत संताप व्यक्त केला. या वेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, सुजित चव्हाण, संभाजी भोकरे, शिवाजीराव जाधव, दत्ता टिपुगडे, अवधूत साळोखे, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, राजू पाटील, शशिकांत बिडकर, मंजीत माने यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.