स्वरा फाउंडेशनची निराधारांना ‘मायेची ऊब’

0
81

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वरा फाउंडेशनच्या वतीने ‘मायेची ऊब’ या अभियानातर्गंत  थंडीपासून बचावासाठी निराधार, वाटसरू, पदपथावर झापलेल्या अभाग्यांना ब्लँकेट, शाल देण्याची मोहीम सुरू केली आहे. 

या मोहीमेतर्गंत व्हीनस कार्नर, लक्ष्मीपुरी शाहूपुरी परीख पूल येथे ब्लँकेट, शाल वाटप करण्यात आली. दरम्यान, स्वरा फाउंडेशनची टीम प्रत्येक रात्री निराधार लोकांना मायेची ऊब या उपक्रमा अंतर्गत ब्लँकेट, शाल देऊन त्यांचे थंडीपासून संरक्षण करणार आहे. यावेळी फाउंडेशन डायरेक्टर प्राजक्ता माजगावकर, प्रमोद माजगावकर, स्वरा फाउंडेशनचे उपाध्यक्ष पियुष हुलस्वार, राहुल वास्कर आदी उपस्थित होते.