स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेने दत्तक विद्यार्थ्याला दिले शैक्षणिक साहित्य..

0
77

पन्हाळा (प्रतिनिधी) : तिरपण ता. पन्हाळा येथील युवराज बाबुराव पाटील या शेतकऱ्याचे बांधकाम चालू असणार्‍या शेजारील घराची भिंत कोसळून दोन महिन्यापूर्वी अपघाती निधन झाले होते. घरी अंध वडील, म्हातारी आई, मतिमंद अविवाहित बहीण, पत्नी आणि चौदा वर्षांचा मुलगा असे युवराजच्या कमाईवर अवलंबून असणारे कुटुंब निराधार बनले. यावेळी समाजातील दानशूर व्यक्तींनी पैशाच्या स्वरुपात मदतही केली.

पितृछत्र हरवलेल्या आणि आठवीमध्ये शिकणार्‍या अथर्वच्या शिक्षणाचा खर्च उभा राहिला होता. यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषद आणि सौरभ शेट्टी यांनी अथर्वला पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी दत्तक घेतले. तसेच त्याला या वर्षीसाठीचे शैक्षणिक आणि शालोपयोगी साहित्य सौरभ शेट्टी यांच्या हस्ते देऊन शिक्षणासाठी पाठबळ दिले.

यावेळी स्वाभिमानीचे युवा तालुकाध्यक्ष विक्रम पाटील, बाबासो पाटील, सुरेश पाटील,गुंडा पाटील, भैरू कुंभार, डे. सरपंच निवास मालवणे पाटील, चेतन जाधव, संदीप बोळावे, निवास कांबळे, विष्णु पाटील, राजेश पाटील, बाळासो पाटील आदी उपस्थित होते.