बुलढाणा (प्रतिनिधी) : दिल्ली येथे नव्या कृषी धोरणांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यावेळी केंद्र सरकारने त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अनेक शेतकरी जखमी झाले आहे. त्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ तसेच केंद्र सरकारच्या विरोधात आज (मंगळवार) वरवंड (जि.बुलडाणा) येथे स्वाभिमानी शेतकरी घटनेच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी राणा चंदन, दत्तात्रय जेऊघाले, शेख रफीक, शेख करीम, आकाश माळोदे, समाधान धंदर यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.