खेबवडेच्या उपसरपंचपदी सुयोग वाडकर बिनविरोध…

0
225

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील खेबवडेच्या उपसरपंचपदी सुयोग वाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. खेबवडे गावचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. पण या ठिकाणी या प्रवर्गातील उमेदवार नसल्याने या ठिकाणचे सरपंचपद रिक्त ठेवण्यात आले आहे.

सुयोग वाडकर यांची निवड होताच त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची अतिषबाजी केली. या निवडीवेळी ग्रामविकास अधिकारी बशीर मुजावर, बाबासाहेब कोळी, माजी सरपंच सुभाष वाडकर, ग्रा.पं.सदस्य आदींसह विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.