गडमुडशिंगी येथे एकाचा संशयास्पद मृत्यू…

0
156

करवीर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथील सेट्रींग व्यवसाय करणाऱ्या निलेश अंतु माळगे (वय ४५) याचा मृतदेह आढळून आला. ही घटना आज (सोमवार) सकाळी येथील मराठा चौकात एका  मंडळाच्या खोलीत उघडकीस आली. मात्र, हा घातपात की अपघात हे अद्याप कळाले नाही.

गडमुडशिंगी येथील निलेश माळगे हे सेंट्रींग व्यवसाय करीत होते. ते पत्नी आणि दोन मुलांसह स्मशानभुमी नजीकच्या परीसरात राहत होते. त्यांना दारुचे व्यसन होते. शनिवारी दुपारी ते जेवण करुन घरातून बाहेर निघून गेले होते. गडमुडशिंगी येथील मराठा चौकात एका मंडळाच्या खोलीचे बांधकाम सुरु आहे. तिथे त्यांचा मृतदेह सापडला. या मृतदेहाला मुंग्या लागल्या होत्या तर तोंडातून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले.

मात्र, हा अपघात आहे घातपात याचा शोध पोलिस घेत आहेत. माळगे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.  या घटनेची नोंद गांधीनगर पोलीसात झाली आहे.