खोतवाडीत युवकाचा संशयास्पद मृत्यू

0
203

इचलकरंजी (प्रतिनिधी) : अज्ञात कारणातून केलेल्या मारहाणीत युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार) उघडकीस आली आहे. खोतवाडी येथील संगमनगरमधील कोल्हापुरी ढाब्याजवळ ही घटना घडली आहे. संबंधित युवक हा इचलकरंजीतील भोनेमाळ येथील असल्याचे समजते. मृत युवकाचे डोके जमिनीवर आपटल्याची व शरीरावर इतरत्र खरचटल्याच्या खुणा पोलिसांना आढळून आल्या आहेत. शहापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश खराडे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले आहेत. सदरची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे का ? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.