राजारामपुरीमध्ये दुसऱ्या मजल्यावरुन पडून महिलेचा संशयास्पद मृत्यू…

0
67

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात राजारामपुरीमध्ये ११ व्या गल्लीत तवणाप्पा पाटणे हायस्कूल रोडवर एका तीन मजली अर्पाटमेंटच्या दुसऱ्या   मजल्यावरून पडून महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही घटना आज (मंगळवार) दुपारी घडली. शोभा कांबळे (वय ४०, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी रवी गोविंद कांबळे (वय २४, रा. कनानगर), सुहास भगवान पवार (वय २३, रा. कनानगर) आणि नवाजजबी शेख (वय १९, रा. साळुंखे पार्क) याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रथमदर्शनी या महिलेला तीन आरोपींनी मसाज पार्लरमध्ये गैरप्रकार चालत असून याची माहिती पोलिसांनी देवून छापा टाकायला लावण्याची धमकी देत १ लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यामुळे आज दुपारी अर्पाटमेंटमध्ये त्यांना आल्याचे या महिलेने बघितले. किंवा पोलिसांच्या कारवाईच्या भितीने ही मयत महिला लपण्यासाठी गेली असता तिचा दुसऱ्या मजल्यावर तोल जावून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली.

तर याबाबत रात्री उशिरापर्यंत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.