लखनौ : भारताचा क्रिकेटर सूर्यकुमार यादव याने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामना हा लखनौ येथे खेळवण्यात आला होता.
या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर ६ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला ९९ धावांवर रोखले; परंतु १०० धावांचा टप्पा पार करत असताना भारतीय खेळाडूंची दमछाक झाली. तेव्हा भारताचा डाव सावरण्यासाठी नेहमी चौकार-षटकारांची आतषबाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने संथ खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.
लखनौमधील दुसरा सामना झाल्यानंतर सोमवारी सूर्यकुमारने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यांच्या भेटीचा फोटो योगींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला.