Published September 22, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत आज (मंगळवार) दिवसभरात 8125 घरांचे आणि 36,461 नागरीकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. संदर्भित केलेल्या 122 रुग्णांपैकी 15 जण कोरोना पॉझिटिव्ह तर सारीचे 27 रूग्ण आढळले असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज (मंगळवार) दिली. 

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत संपूर्ण शहरात सुरु असलेल्या सर्व्हेक्षणामध्ये आज 143 जणांचे स्वॅब घेतले असून यामध्ये आरटीपीसीआर   केलेले 121 त अॅनिजेन टेस्ट केलेल्या 22 रुग्णांचा समावेश आहे. तर आयएलआयचे लक्षणे आढळलेले रुग्ण 80, कोमॉबीड आजार असलेले रुग्ण 3228, सारीचे लक्षणे आढळलेले रुग्ण 27,  संदर्भित केलेले रुग्ण 122 असून संदर्भित केलेल्या रुग्णांपैकी कोरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण 15 आहेत.

शहरातील 11 कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून माझे कुटुंब माझी जबाबदारी यामोहीमेअंतर्गत आज तपासणी करण्यात आलेल्या नागरीकांची कुटुंब कल्याण केंद्र निहाय माहिती अशी, कुटुंब कल्याण केंद्र, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल 577 घरांचे  आणि 337 नागरिकांचे,  कुटुंब कल्याण केंद्र, फिरंगाई 850 घरांचे आणि 4018 नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र, राजारामपुरी 680 घरांचे आणि 2522 नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र पंचगंगा हॉस्पिटल 625 घरांचे आणि 2455 नागरिकांचे,  कुटुंब कल्याण केंद्र, कसबा बावडा 928 घरांचे आणि 3679 नागरिकांचे,

कुटुंब कल्याण केंद्र, महाडीक माळ 665 घरांचे आणि 2544 नागरिकांचे,  कुटुंब कल्याण केंद्र, आयसोलेशन हॉस्पिटल 869 घरांचे 2853 नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र, फुलेवाडी 718 घरांचे 3549 नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र, सदर बझारसाठी 210 घरांचे व 3516 नागरिकांचे,  कुटुंब कल्याण केंद्र, सिध्दार्थनगर 823 घरांचे 4278 नागरिकांचे आणि कुटुंब कल्याण केंद्र मोरे- मानेनगर 1180 घरांचे आणि 4710 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023