कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत आज दिवसभरात ४१४६ घरांचे आणि १६२५० लोकांचे  सर्व्हेक्षण करण्यात आले असून संदर्भित केलेल्या ४२ रुग्णांपैकी १० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत संपूर्ण शहरात सुरु असलेल्या सर्व्हेक्षणामध्ये आज ३६ जणांचे स्वॅब घेतले असून यामध्ये  RTPCR  केलेले – २९ तर ANIGEN TEST केलेल्या – ७ रुग्णांचा समावेश असून सदी, खोकला, तापाची (ILI) लक्षणे आढळलेले रुग्ण – ३५, कोमॉबीड आजार असलेले रुग्ण – ७२७,  संदर्भित केलेले रुग्ण – ४२ असून  संदर्भित केलेल्या रुग्णापैकी कोरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण १० आहेत.

शहरातील ११ कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेअंतर्गत आज दिनांक ५ ऑक्टोंबर रोजी तपासणी करण्यात आलेल्या नागरीकांची कुटुंब कल्याण केंद निहाय माहिती अशी कुटुंब कल्याण केंद्र सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ३८१ घरांचे व २१९५ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र राजारामपुरी ४४१ घरांचे व १७२३ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र कसबा बावडा ५७२ घरांचे व २३३२ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र फुलेवाडी ३०० घरांचे व १०६४ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र सदर बझारसाठी ६७ घरांचे व २४५ नागरिकांचे, कुटुंब कल्याण केंद्र सिध्दार्थनगरसाठी २३१५ घरांचे व ९३४८ नागरिकांचे आणि कुटुंब कल्याण केंद्र मोरे मानेनगर ७० घरांचे व २४३ नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.