इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीची सुकन्या सुरभि राजेंद्र निंबाळकर या हिने बायो- मेडिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात अत्यंत महत्वाचे संशोधन केले आहे. ग्राफिनपासून मेंदूमध्ये बसवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून त्याच्या यशस्वी चाचण्याही घेतल्या आहेत.

सुरभी हिने ‘डीकेटीई’च्या अनंतराव भिडे व गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. जगभरातील कोट्यवधी लोक पार्किन्सन, स्ट्रोक, एपिलेप्सी, कंपवात सारख्या मेंदूशी निगडित विकारांनी ग्रासले आहेत. या संशोधनामुळे मेंदूशी निगडित असणाऱ्या रुग्णासाठी प्रोब्स व ब्रेन – कॉम्प्युटर इंटरफेसेस (BCI) महत्त्वाचे ठरणार आहेत. मानवी मेंदू आणि कॉम्प्युटर यांचा एकमेकांशी संवाद साधण्याकरिता इंटरफेस तयार करण्यासाठी अमेरिकेत स्थापन झालेल्या ग्राफटॉन या स्टार्टअप कंपनीमध्ये सुरभी ही सध्या सिनिअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. तसेच इंटेल या जगप्रसिद्ध कंपनीत इंटर्नशिपही करत आहे.