नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपत्तीच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) मोठा निर्णय दिला आहे. यामध्ये विधवा महिलेला माहेरच्या लोकांनी आपल्या वारसा हक्कातील संपत्ती देता येऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले आहे.

हिंदू वारसाहक्क कायद्यानुसार हिंदू महिलेच्या वडिलांकडील लोकांना अनोळखी समजता येत नाही. त्यांना संपत्ती सोपवली जावू शकते असा निर्णय गुरुग्रामधील एका परिवाराच्या प्रकरणात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला एका परिवाराने आव्हान दिले होते. माहेरची मंडळी ही महिलेच्या परिवारातील सदस्य आहेत, असं न्या. अशोक भूषण आणि न्या. आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं.