नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मार्गदर्शक तत्त्वांंअभावी देशात कोरोना वणव्यासारखा पसरला. देशवासीयांना लॉकडाऊनबाबतची पूर्वकल्पना द्यायला हवी होती, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळात राज्ये आणि केंद्र सरकारमध्ये संवाद नव्हता, असेही ताशेरे न्यायालयाने मारले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाकडून कोरोनाबाबत सरकारची कानउघाडणी करण्यात आली. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मार्गदर्शक तत्त्व आणि प्रमाणित प्रक्रियेचं पालन झाले नाही. यामुळे कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला. याच्या प्रतिबंधासाठी आणखी उपाययोजना करायला हव्या होत्या. कोरोनावरील उपचार सामान्य़ांना परवडणारे नाहीत तसेच खासगी रूग्णालयांच्या उपचारांवर मर्यादा हवी. कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन काळात नागरिकांना रोजीरोटीचा प्रश्न उद्भवला. लॉकडाऊनची पूर्वकल्पना देऊन नागरिकांच्या रोजीरोटीची व्यवस्था करत नियमांचे पालन करता येईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.