Published September 22, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मृत्यू पावलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी बँक पहाडासारखी उभी आहे,  असा विश्वास  बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

कोरोनाग्रस्त होऊन बरे झालेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च बँक देणार असल्याचेही, त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात कोरोनावर उपचार घेत असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये तशा प्रकारचा निर्णय व्हावा, अशी ईच्छा  पत्राद्वारे व्यक्त केली आहे. बँकेच्या शुक्रवारी  (दि. २५) होणाऱ्या संचालकांच्या  बैठकीस ते उपस्थित राहू शकणार नाहीत.

बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी अनुक्रमे, संजय आण्‍णासो पाटील (रा. टाकळी –  शाखा अकिवाट), अशोक भाऊ पाटील (रा. हडलगे -शाखा महागाव), पांडुरंग मुरलीधर शेंडगे (रा. कुंभोज – शाखा हातकणंगले) व प्रशांत प्रकाश नाईक (रा. कागल – केंद्र कार्यालय), कोल्हापूर हे या महामारीमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. बँकेसाठी आणि ग्राहकांच्या सेवेसाठी त्यांना जीवाला मुकावे लागले. त्यांच्या मृतात्म्यास मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये मी, बँकेचे सर्व संचालक व संपूर्ण बँक परिवार एक कुटुंब म्हणून पहाडासारखे उभे आहोत. या महामारीमध्ये मृत्यू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय एकाकी नाहीत, त्याबद्दल त्यांनी खात्री बाळगावी.

यापूर्वीच बँकेने दुर्दैवाने मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना १० लाख रुपये एलआयसीकडून विमाकवच घेतले आहे. तसेच बँकेने नफ्यातून ५ लाख रुपये व ईडीएलआय योजनेतून (एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम) ६ लाख रुपये असे एकूण २१ लाख रुपये कुटुंबीयांना मिळण्याची व्यवस्था केलेली आहेच. त्याशिवाय, अनुकंपा तत्त्वावर लवकरच त्यांच्या वारसांस सेवेत रुजू करून घेण्याचे यापूर्वीच एकमताने ठरवले आहे. यापुढे फक्त जे या महामारीने आजारी पडतील, त्यांना दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी बँकेच्या कल्याण मंडळाकडून २ लाख रुपयेपर्यंत दवाखान्याच्या खर्चासाठी विमा दिला जाणार आहे. हा विषय तसेच या महामारीने आजारी पडून बरे होऊन घरी परतले आहेत व दवाखान्याचा खर्च स्वतः भागवला आहे. त्यांना बँकेच्या वैद्यकीय सहायता निधी योजनेमधून दोन लाखापर्यंतचा योग्य खर्च देण्याचा विषय आजच्या विषय पत्रिकेत आहे. यासंदर्भातील योग्य ती नियमावली बँक लवकरच जाहीर करणार आहे.

 

September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023