आयटीआय निदेशक संघटना, ‘फेम’चा जयंत आसगावकर यांना पाठिंबा

0
340

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना व फेडरेशन ऑफ मायनॉरिटी एज्युकेशन ऑर्गनायझेशन या संघटनांनी पुणे शिक्षक विधान परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबतची माहिती त्यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या पत्रकात म्हटले आहे की,  महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. आसगांवकर  प्रामाणिक व कर्तव्यदक्ष उमेदवार आहेत. त्यांच्याकडून संघटनेने पाठिंबा द्यावा अशा मागणीचे पत्र प्राप्त झाले होते. उमेदवार योग्य असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आयटीआय निदेशक संघटनेचे अध्यक्ष महादेव माळी,  सरचिटणीस विनोद दुर्गपुरोहित यांच्या तसेच फेमच्या अध्यक्षा डॉ. फौजिया खान यांच्या या पत्रकावर स्वाक्षरी आहेत.