शरद कारखान्याकडून निवारा छावणीवरील जनावरांसाठी चारा पुरवठा…

0
30

शिरोळ (प्रतिनिधी) :  शिरोळ तालुक्यातील पूरबाधित गावांमधील जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले होते. यावेळी निवारा छावणीवरील जनावरांसाठी आज (गुरुवा) शरद साखर कारखान्याकडून चारा पुरवठा करण्यात आला. अशी माहिती शरद सहकारी साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुपाल आवटी यांनी दिली.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शरद सहकारी साखर कारखान्याने शिरोळ, शरद कृषी महाविद्याल जैनापुर येथील निवारा छावणी, दानोळी, शिक्षकी आणि हेरवाड गावांमधील निवारा छावणीवर एकत्रित चारा पुरवठा करण्यात आला. यावेळी मुख्य शेती अधिकारी दीपक पाटील, अॅग्री ओव्हरसियर महावीर ऐनापुरे, प्रकाश चौगुले, विक्रम पिष्टे, शेतकरी उपस्थित होते.