मुंबई (प्रतिनिधी) :  कन्नड सुपरस्टार अभिनेता पुनीत राजकुमार याचे आज (शुक्रवार) सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना वयाच्या ४६ वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस बोम्मई अभिनेत्याची विचारणा करण्यासाठी रुग्णालयात उपस्थित होते.

पुनीत याने ४६ व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. पुनीतच्या प्रकृती बद्दल सांगताना डॉ. रंगानाथ नायकने एएनआयला सांगितलं  की, ‘सकाळी अकरा वाजता अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छातीत त्रास होत असल्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. याआधी पुनितला एका  खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.’पुनीतची प्रकृती फार चिंताजनक होती.

पुनितला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला असल्याचं देखील डॉक्टर म्हणाले. पुनीतच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला. याआधी  अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने सर्वांन  धक्का बसला होता.