कोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची आज (शुक्रवार) तडकाफडकी बदली  करण्यात आली. चंद्रमनी इंदूरकर यांच्याकडे कळंबा कारागृहचा पदभार  देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद  यांनी दिले.

शेळके यांची येरवडा कारागृहात बदली करण्यात आली आहे. तर येरवडा येथील सी.एच.इंदूलकर यांच्याकडे कळंबा कारागृहाचा पदभार देण्यात आला आहे. कळंबा कारागृहात गेल्या काही दिवसात घडलेले  गैरप्रकार आणि कारागृहात मंगळवारी आढळलेला गांजा आणि मोबाईल प्रकरण शेळके यांनी भोवल्याचे बोलले जात आहे. या प्रकऱणाची गंभीर दखल घेत पोलीस महासंचालक रामानंद  आज  कळंबा कारागृहाला भेट देऊन आढावा घेणार आहेत.

दरम्यान, कळंबा जेलमध्ये मंगळवारी रात्री  १० मोबाईल, पाऊण किलो गांजा, चार्जर, दोन पेन ड्राईव्ह सापडले आहेत. या प्रकरणाची अप्पर पोलीस महासंचालकांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शरद शेळके यांची बदली कऱण्यात आली आहे.  कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुरक्षारक्षकांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.