मुंबई  (प्रतिनिधी) :  यूएईमध्ये सुरु झालेल्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे बीसीसीआय  आणि आयपीएल  मॅनेजमेंटच्या चिंता वाढल्या आहेत. सनराइजर्स हैदराबादचा खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.   त्याच्या संपर्कात आलेले ६ खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत.

स सामना खेळला जाणार आहे. सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज टी. नटराजन सामना सुरू होण्याआधी केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीतून कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. यानंतर त्याच्या संपर्कात आलेले खेळाडू आणि कर्मचारी यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, नरायझर्स हैदराबादचा आज (बुधवार) संध्याकाळी दिल्ली कॅपिटल्सशी सामना होणार आहे. मात्र, आजच्या सामन्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

विजय शंकर (खेळाडू), विजयकुमार (टीम मॅनेजर),  श्याम सुंदर (फिजिओ), अंजना वन्नन (डॉक्टर),  तुषार खेडकर (लॉजिस्टिक मॅनेजर),  गणेशन (गोलंदाज) यांना आयसोलेट केले आहे.

आयपीएल  हंगामाच्या सुरुवातीलाही कोरोना प्रकरणे समोर आल्यानंतर भारतात सुरु असलेली आयपीएल काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयपीएलचे सामने पुन्हा सुरू करण्यात आले  आहेत.