कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी पदी सुनील सोनटक्के…

0
29

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी सुनील सोनटक्के रुजू झाले. सहायक संचालक (माहिती) फारुख बागवान यांच्याकडून आज (सोमवार) सुनील सोनटक्के यांनी जिल्हा माहिती अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली.

सोनटक्के हे उस्मानाबाद जिल्ह्यातील बेंबळी गावचे आहेत. यांनी आजवर जळगाव येथे माहिती अधिकारी म्हणून तर हिंगोली, सोलापूर आणि लातूर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. लातूर विभागाचे प्रभारी उपसंचालक म्हणून  त्यांनी दहा महिने अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. याशिवाय बीड, उस्मानाबाद येथे प्रत्येकी एक वर्ष तर नांदेड येथे अतिरिक्त जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यभार पार पाडला आहे.

यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, माहिती सहायक एकनाथ पवार, सचिन वाघ, रोहित माने, सतीश कोरे, अनिल यमकर, दामू दाते, स्वप्नाली कुंभार आदी उपस्थित होते.