ठाण्यातील मृत पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे नाहीत : सुनील केदार

0
97
(संग्रहित छायाचित्र)

ठाणे (प्रतिनिधी) : एकीकडे जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू मूळ पदावर येत असतानाच ठाण्यात तब्बल सोळा पक्षी मृतावस्थेत सापडल्याने बर्ड फ्लूच्या शंकेने हाहाकार उडाला आहे. या पक्ष्यांच्या मृतदेहाची तपासणीसाठी पुणे येथे करण्यात आली असून त्यांच्यामध्ये बर्ड फ्लूची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याचे मंत्री सुनील केदार यांनी स्पष्ट केले. यामुळे त्या पक्ष्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अनुत्तरित राहिले आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय गार्डन या गृहसंकुलातील, जिथे काल सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या काही नागरिकांना काही पाणबगळे आणि २ पोपट मृतावस्थेत आढळून आले. एकाच वेळी एवढे पक्षी मृतावस्थेत आढळल्याने ठाणे महापालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी देखील बुचकळ्यात पडले. त्यांनी या पैकी १० पक्ष्यांचे मृतदेह मृत्यूच्या कारणाच्या चौकशीसाठी आधी देवनार आणि नंतर पुण्याला पाठवले. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने महापालिका प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला.