बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी सुनील गुट्टेला अटक

0
178

मुंबई (प्रतिनिधी) : बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी रत्नाकर गुट्टे याचा मुलगा सुनील गुट्टे याला आज (गुरूवार) अटक करण्यात आली. जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनायाने ही कारवाई केली आहे. सुनील याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 

सुनील गुट्टे हे सुनील हायटेक इंजीनिअरिंग लिमिटेडचे संचालक आहेत. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच आयटीसीचा वापर करणे. वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बोगस पावत्यांच्या बळावर ५२० कोटी रुपये आयटीसी मिळवल्याचा सुनील गुट्टे यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.

सुनील हायटेक इंजिनिअर्स लिमिटेडने अंदाजे ३ हजार कोटी रुपयांच्या बनावट पावत्या दिल्या आणि घेतल्या आहेत. यात ५२० कोटींचा आयटीसीचा समावेश आहे. देशभरात या बोगस बिलांचा अनेकांना फटका बसला आहे. देशभरात बनावट आयटीसी कार्टेलमध्ये  प्रमुख घोटाळेबाज कंपन्या म्हणून सुनील हायटेक कंपनीची ओळख निर्माण झाली आहे,  असे जीएसटी विभागाने म्हटले आहे.